आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवापूर:विसरवाडीत कोरोना बाधित महिलेचा मृत्यू,नवापूरात एका 38 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

नवापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील एका ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आला व सायंकाळी महिलेचा मृत्यू झाल्याने नवापूर तालुक्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गावात तात्काळ प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य पथक दाखल झाले. 

दुसरीकडे नवापूर शहरात संध्याकाळी सुरत येथे उपचार घेत असलेले 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली. सकाळी 67 वर्षीय वडील पॉझिटिव्ह झाले आणि संध्याकाळपर्यंत मुलगा पॉझिटिव्ह झाल्याचे कलाले. पिता-पुत्रांवर सुरत येथे उपचार सुरू आहे. आतापर्यंत नवापूर तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण झाले त्यात 3 कोरोना नियंत्रित पाच जणांवर उपचार सुरू व विसरवाडी येथील 53 वर्षीय महिलेचा संध्याकाळी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहीत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

बाधित महिलेच्या संपर्कातील १० जणांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले असुन उत्तमनगर परिसर बेरिकेटिंग करत कंन्टेन्मेट झोन म्हणून प्रशासनाने घोषित करण्यात आले.विसरवाडी येथील ५२ वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटत असल्याने नंदुरबार येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेले असता जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेतल्यानंतर दिनांक १४ मंगळवार रोजी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने विसरवाडी गावात एकच खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीच्या परिसरात ग्रामपंचायत मार्फत निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यात आली. तसेच कंटेनमेंट झोन परिसरात बेरिकेटिंग करुन सील केले. 

सदर बाधित महिलेच्या संपर्कातील पती, मुलगा, दुकानातील नोकर, घर काम करणारी महिला व तिच्या परिवारातील सहा जण व वाहन चालक असे एकूण १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले असुन सदर महिला ही नित्यनेमाने शिवमंदिरात पूजेस जात असल्यामुळे शिव मंदिर परिसर देखील बॅरिकेट्स लावण्यात आले व परिसरातील कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी आरोग्य तपासणी संपर्क सुरु असुन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करावा, जास्त गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नये. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत वसावे यांनी दिली.