आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Corona Outbreak Updates: A Young Man From Kolhapur Cycled 30,000 Km; Awakening On Corona In 32 Districts In Seven Months; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोल्हापूर येथील तरुणाने सायकलीने पार केला 30 हजार किलोमीटरचा टप्पा; सात महिन्यांत ३२ जिल्ह्यांत कोरोनावर प्रबोधन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूरचा नितीन नांगेनूरकर सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाविषयक जनजागृती करतो आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला हाेता. कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता लोकांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करता यावे याकरिता कोल्हापूर येथील २९ वर्षीय तरुणाने ७ महिन्यांपूर्वी सायकलने प्रवास सुरू केला असून, या प्रवासात तो कोरोनाविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहे. कोल्हापूर येथील नितीन गणपत नांगेनूरकर या २९ वर्षीय तरुणाचे कोल्हापूरमध्ये सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. गेल्या वर्षी राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नितीन याने सायकलने प्रवास करण्याचे ठरवले. १ सप्टेंबर २०२० रोजी त्याने कोल्हापूर गावापासून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली.

या प्रवासात तो प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामीण भाग याठिकाणी जाऊन लोकांना कोरोनाविषयी माहिती देत आहे. कोरोनापासून बचाव कसा करावा याविषयी माहिती देत असतानाच त्याने नियमांचे जॅकेट अंगात घातले असून, सायकलवर झेंडा लावला अाहे. यावरदेखील कोरोनाविषयी माहिती लिहिलेली आहे.नितीनला या कामासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळत असून, ज्या गावात तो जातो त्याठिकाणी प्रशासनातर्फे त्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून तो जळगाव जिल्ह्यात आला असून, याठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन तो जनजागृती करत आहे.

डोक्यावर लिहिले आहे ‘कोरोना’
नितीन याने डोक्याच्या मागील बाजूस कोरोना नावाची कटिंग केली असून, याद्वारेदेखील त्याने अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे. दरम्यान, नितीन याने परिधान केलेल्या बॅनरच्या जॅकेटवर “मी जबाबदार’ लिहिलेले असून कोरोनाविषयी माहिती दिलेली आहे.

जळगाव जिल्ह्यातही केली जनजागृती
नितीन गेल्या सात महिन्यांपासून सायकलवर फिरून जनजागृती करत असून, आतापर्यंत त्याने जळगावसह ३२ जिल्ह्यातील २८४ तालुक्यांत भेट दिली आहे. यात त्याने आतापर्यंत ३० हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला असून, संपूर्ण महाराष्ट्रात तो काेराेनावर जनजागृती करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...