आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:शनि पेठेतील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र मनपाने केले बंद; नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे महापालिकेचा निर्णय

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेसाठी सुरु करण्यात आलेल्या केंद्रापैकी शनिपेेठेतील रिधुरवाड्याचे केंद्र प्रतिसादाअभावी बंद केले. आता १३ केंद्र सुरू राहणार आहेत. १२ ते१४ वयोगट, १५ ते १७ वयोगट व १८ वर्षांवरील लाभार्थींसाठी वेगवेगळे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. नागरीकांच्या सोयीनुसार शहरात विविध ठिकाणी केंद्र सुरु करण्यात आले होते.

त्यात १२ ते १४ वयोगटाच्या लाभार्थींसाठी शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनरातील डी. बी. जैन हॉस्पिटल, निमखेडीतील कांताई नेत्रालय, सिव्हिल हॉस्पिटल शेजारील रेडक्रॉस सेसायटी आणि शनिपेठ, रिधुरवाड्यातील मनपा शाळा या पाच केंद्रांवर लसीकरण होत होते. परंतु, महिनाभरापासून शनिपेठेतील केंद्रावर दिवसभरात केवळ चार ते पाच लाभार्थीच येत होते. लसीच्या व्हायलमध्ये किमान २० जणांसाठी डोस असतो.

एकदा व्हायल उघडल्यावर काही तासात तिचा वापर न केल्यास डोस निकामी होताे. त्यामुळे या केंद्रावर येणाऱ्या लाभार्थींना शाहू रुग्णालयात पाठवण्यात येत होते. त्यामुळे हे केंद्र बंद करण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...