आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवापूर:उच्छल येथील 27 वर्षिय महिलेच्या संपर्कातील आठ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या उच्छल शहरातील एक 27 वर्षिय महिला कोरोना पॉझिटिव आढळल्याने त्यांचा संपर्कातील आठ जणांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट आज निगेटिव्ह आल्याने तूर्त नवापूर शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नवापूर रेल्वे स्टेशन परिसरातील व नवापूर शहरातील मित्र व परिवाराच्या सदस्यांना नवापूर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तहसीलदार सुनिता ज-हाड, यांनी पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मदतीने त्यांना नवापूर शहरातील क्वारेंटाईन कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या आठ व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना पुढील 14 दिवस नवापूर क्वारेंटाईन कक्षात ठेवण्यात येईल. जो पर्यंत पुढील दुसरा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तो पर्यंत त्यांची क्वारंटाईन कक्षातून सुटका करता येणार नाही अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली आहे.

आठ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नवापूरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. खबरदारी म्हणून नवापूर रेल्वे स्टेशन परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बाहेरून कोणी व्यक्ती आल्यास त्याची माहिती तात्काळ तालुका प्रशासनाला द्यावी असे आवाहन नवापूर तालुका प्रशासनाने केले आहे.

नवापूर शहरातील वरिष्ठ महाविद्यालयातील वसतिगृहात प्राथमिक सुविधेचा अभाव असल्याची तक्रार पुन्हा येत असल्याने नवापूर तालुका प्रशासनाने सुविधा वेळेवर पुरविण्यात बाबत उपाययोजना कराव्यात.

बातम्या आणखी आहेत...