आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण लसीकरण हेच एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे आगामी काळात लसीकरण हेच आपले मिशन राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शनिवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
पाळधी येथील आरोग्य केंद्राने जनतेच्या सेवेत रुजू होण्याआधीच कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा एक मापदंड प्रस्थापित केला असून, आता याच्याच माध्यमातून परिसरातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहे. पाळधीपासून जवळच पथराड रस्त्यावर अतिशय भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे.
मुलांसाठी तातडीने रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन
पालकमंत्री म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हा अतिशय प्रशस्त, हवेशीर आणि आरोग्यवर्धक आहे. हॉस्पिटलला लागूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली असून, त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट ही उंबरठ्यावर असताना जिल्ह्यात लसीकरणाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही डोस फक्त ८० टक्के लोकांनीच घेतले असून, उरलेल्यांनी यासाठी तातडीने नोंदणी करावी तर आजपासून १५ वर्षांवरील मुला-मुलींची नोंदणी सुरू झाली असल्याने पालकांनी आपल्या मुलांसाठी तातडीने रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहनदेखील केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक अमोल कासट, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, उदय झंवर, गोकुळ लंके, माजी सरपंच शरद शिंदे, अण्णा पाटील, भागवान मराठे, शरद कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील, डॉ. विनय चौधरी व डॉ. प्रशांत गर्ग, अरुण पाटील, धनराज कासट, शेरी सरपंच कैलास पाटील, मच्छिंद्र सपकाळे, दत्तू ठाकूर, दीपक सावळे, सौरभ पाचपोळ यांच्यासह आरोग्य सेवक, सेविका, आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.