आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोपडा:कोरोनाचा चोपड्यात पहिला बळी, चोपडेकरांनो आता तरी सावध व्हा...

चोपडाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कडककीत बंद नंतर बाजारात होते रिकामी गर्दी

प्रवीण पाटील 

फक्त तीन दिवसात कोरोना लागण झाल्याचे जाहीर झाल्यानंतर आज दोन पैकी एकाचा मृत्यू झाल्याने चोपडा शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेल्याचे माहिती मिळाली आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद गावानंतर चोपडा शहरात (दि 8) रोजी कोरोनाची एन्ट्री केल्याने शहरातील मल्हारपुरा व खुर्शीद अळी भागात दोन कोरोनाबाधित आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यात खुर्शीद अळी भागातील 55 वर्षीय महिला व धुळे येथील नोकरीला असलेले मल्हारपुरा , चोपडा येथील 38 वर्षीय तरुणांचा सहभाग होता. त्यापैकी आज 55 वर्षीय महिलेने कोरोना आजारात आपला प्राण गमवावा लागला आहे.

जवळच अमळनेर तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना चोपडेकराना आता सावधान व्हावे लागणार आहे,अन्यथा अमळनेर ची वेळ चोपड्यावर येण्यास वेळ लागणार नाही. अमळनेर वाशियानी ज्या चूका केल्या त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे,म्हणून चोपडा तालुका वाशियानी लॉक डाउन मध्ये घरात बसण्याची शक्ती असताना अनेक जण बेफिकीरीने रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.शेवटी पोलिसांचे मनुष्यबळ लक्षात घेता स्वतःला स्वतःची काळजी घेणे आवश्यक असताना बिना मास्क राहू नका,वारंवार हात स्वच्छ साबणाने दुधले पाहिजेत, कोरोटाईन केलेले असताना नाहक कोणाच्या संपर्कात जाऊ नका, या छोट्याछोट्या गोष्टी आमलात आणल्या तरच चोपडा तालुक्यातुन कोरोना हद्दपार होऊ शकतो अन्यथा चोपडा पासून अलमनेर लांब नाही हे लक्षात ठेवावे लागेल.

तालुक्यातील अडावद नंतर चोपड्यात

कोरोना ची एन्ट्री ८ रोजी झाल्यानंतर आज चोपड्यात पहिला बळी गेला असून अडावद गावात एकूण चारपैकी दोन जणांचा मृत्यु झाला आहे.त्यामुळे चोपडा तालुक्यातील कोरोना मुळे एकूण तीन जण मयत झाले आहेत.कोरोना पोजिटिव्ह असलेले अडावद येथील आता दोन जण जळगावला उपचार घेत असून गावात २५ जण होमकोरोटाईन तर चोपड्यात १५ जण कोव्हिड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत.अडावद गावात एक जण २८ एप्रिल तर दुसरा ९ मे रोजी मयत झाले होते त्यानंतर आज चोपडा शहरात पहिला बळी गेल्याने अडावद व चोपडा शहर कडकडीत बंद असले तरी तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र बोटावर मोजण्या एवढं लोक मास्क वापरताना दिसतात.त्यामुळे ग्रामीण भागात स्थानिक गाव पुढाऱ्यानी देखील कोरोनाचे गांभीर्य अजिबात दिसत नाही.

कडककीत बंद नंतर बाजारात होते रिकामी गर्दी

चोपड्यात कोरोनाचे दोन पोजिटिव्ह सापडल्यानंतर स्थानिक लेव्हल ला पाच दिवस संपूर्ण चोपडा शहर कडकडीत बंद जाहीर केला असला तरी त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी यांनी 17 मे पर्यत लॉकडाऊनचे आदेश दिल्या नंतर आज तिसऱ्या दिवसापर्यत चोपडा शहर कडकडीत बंद असले तरी चोपडा जेव्हा बाजार पेठ उघडेल तेव्हा मात्र सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लॉकडाऊन मध्ये शिस्त पाळणारे बेशस्तीने गावात बाजारपेठेत फिरताना दिसतात.अश्या बेफिरीने फिरणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील अनेकांनी केली आहे.

लहान मोठ्या गल्ल्या देखील केल्या सील

चोपडा शहरात दोन पॉझिटिव्ह सापडल्याने पालिका प्रशासनाने चोपडा शहरात २२ मार्च नंतर प्रथमच लहान सहान मेन रोडला लागणाऱ्या गल्ल्या देखील सील केल्याने अनेकांना फिरणे मुश्किल झाले आहे.बाजार पेठेत येणारे रस्ते सिल केले असले तरी कॉलनी भागात अजून पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे,कारण अनेक ठिकाणी टोळके बसलेले दिसुन येतात.

बातम्या आणखी आहेत...