आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:कोरोनाची धास्ती ; वाटेतच उतरुन दिल्याने 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू , वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेक जण ठीक ठिकाणी  अडकले आहेत. राज्य सरकारने गावी जाण्याची परवानगी देताच सर्वांनी गावाचा रस्ता धरला होता. यातच ट्रकमधून प्रवास करणाऱ्या 80 वर्षीय वृद्धाला कोरोनाच्या धास्तीने वाटेतच उतरुन दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची घटना कारंजा तालुक्यातील सारवाडी जवळील अनुष्का धाब्याजवळ घडली आहे.

उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर येथील रहिवासी असलेले वृद्ध मृतक शांतालाल यादव (वय80) हे मुंबई येथील वास्तव्यास असलेल्या जवायाकडे राहत होते. लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्यांना गावी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे साधन नव्हते. राज्य शासनाने गावी जाण्यासाठी परवानगी देताच ट्रकमधून अनेक मजूर वर्ग प्रवास करीत गावी जाण्याचा निर्णय घेतला.

उत्तरप्रदेशकडे ट्रकमधून मजूर जात असल्याची माहिती मृतकाच्या जवायाला मिळाली असता, त्याच्या ओळखीचे रामसुमेर काशीलाल यादव (वय52) हे सुद्धा गावी जात असल्यामुळे मुंबई येथे जवायाकडे अडकले 80 वर्षीय वृद्ध यांना सोबत घेऊन जाण्यास सांगितले. 16 मे रोजी उत्तरप्रदेशकडे जाणारा ट्रक हा 17 मजूर घेऊन गोरखपूर कडे जात असतांना वाटेतच दोघांना ताप खोकला असल्यामुळे त्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे आणि कोरोनाची धास्ती घेत, कारंजा तालुक्यातील सारवडी येथील अनुष्का ढाब्याजवळ 17 मे रोजी दुपारच्या सुमारास दोघांना उतरुन देण्यात आले होते. त्या दोघांकडे गावी जाण्याचे साधन नसल्यामुळे शांतालाल यादव यांचा रात्री 7 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

घटनेची माहिती कारंजा येथील डॉक्टर सचिन इंगळे यांना मिळताच वैद्यकीय चमू व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संसर्गजन्य आजार असल्यामुळे डॉक्टर व पोलिसांच्या आदेशानुसार त्या वृद्धाचा अंत्यविधी जागेवरच करण्यात आला. मृतकाचा स्त्राव तपासणी करिता सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...