आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​कोरोनामुक्त महिलांना थकवा, अंगदुखीचा त्रास; मटण, मासे, अंडी अन‌ मोड आलेले कडधान्य खा, व्यायाम करा : डॉक्टरांचा सल्ला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काढे घेताना काळजी घ्या, अन्यथा वाढू शकताे आजार

कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक महिला रुग्णांना दीर्घकाळ अशक्तपणा, स्नायूदुखीचा त्रास जाणवताे अाहे. कोविड मुक्तीनंतर धाप लागणे, थकवा, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्या. अन्यथा धाेका वाढू शकताे. कोरोना काळात तीव्र लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना कोरोनावर मात केल्यानंतर काही काळ अशक्तपणा जाणवू शकतो. कारण कोविड संसर्गाने शरीराची बहुतांशी झीज झालेली असते. अशा काळात महिलांनी झेपेल तो व्यायाम आणि शरीराच्या पोषणाकडे लक्ष देणे गरजेचे असते.

मात्र, एका आठवड्यापेक्षा जास्त काळ अशक्तपणा, धाप लागणे अशी लक्षणे आढळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दुसऱ्या लाटेत गंभीर होणाऱ्या रुग्णांची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक अाहे. पण असे असले तरी कोरोनावर मात केल्यानंतरही सतर्क असणे आवश्यक आहे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांनी केले.

काढे घेताना काळजी घ्या, अन्यथा वाढू शकताे अाजार
कोविडवर यशस्वी मात केल्यानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी व्यायामासह विविध प्रकारच्या औषधी आणि काढे घेतले जातात. मात्र, महिलांनी आपले वय, प्रतिकारशक्ती आणि इतर दुर्धर आजार या बाबींचा विचार करूनच आहार, व्यायाम आणि औषधांचे नियोजन करावे. अन्यथा, त्रास कमी हाेण्याएेवजी वाढू शकताे.

व्हिटॅमिनची अाैषधी घ्या
कोविड वॉर्डात उपचार घेतल्यानंतर दिनचर्येत बदल होतो. मात्र, कोविडमुक्तीनंतर पुरेशी झोप घ्यावी. पौष्टिक आहार घ्यावा व ताणतणावमुक्त राहावे. किमान महिनाभर सी व डी व्हिटॅमिनची औषधी घ्याव्या. तसेच इतर पदार्थ घ्यावेत. - डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषधवैद्यक शास्त्र, जीएमसी

प्राेटीनयुक्त पदार्थ खावेत
कोविडनंतर अनेक महिलांमध्ये अशक्तपणा मोठ्या प्रमाणावर बघायला मिळताे आहे. त्रास वाढू नये म्हणून महिलांनी प्रोटीन पावडरसह प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. मांस, मासे, चिकन, कडधान्य खाण्यास प्राधान्य द्यावे. - डॉ. संजय बनसोडे, स्त्रीराेग तज्ज्ञ, जीएमसी, जळगाव

माेकळ्या हवेत फिरा, व्यायाम करा
काेराेनातून बरे झालेल्या महिला रुग्णांना कालांतराने श्वसनाचा त्रास उद‌्भवताे. सारखा अशक्तपणा जाणवताे. ताे दूर करायचा असेल तर हलकासा व्यायाम करा. जेणेकरून स्नायू मजबूत हाेण्यास मदत हाेईल. माेकळ्या हवेत फिरल्याने थकवा दूर हाेताे. महिलांनी महिला प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा. पाेषक अाहारावर अधिक भर द्या.

बातम्या आणखी आहेत...