आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यथा बँकेचे खाते होईल सील:मनपाची कर थकबाकी 300 कोटींवर; वसुली करण्यासाठी पुन्हा अभय योजना

जळगाव6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

गेली आठ महिने फेरमूल्यांकनाच्या कामात अडकलेल्या घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांवर शेवटच्या महिन्यात कर थकबाकी वसुलीचा भार पडला आहे. मार्च महिन्याचे शेवटचे पंधरा दिवस बड्या थकबाकीदारांसाठी अडचणीचे ठरणार आहेत. ३०० काेटींच्या थकबाकीचे भूत मानगुटीवर असताना थकबाकीदारांसाठी पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत अभय याेजनेची घोषणा करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात एक लाख १० हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ५२ कोटींची मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही मिळकत व्यवस्थापन विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. गेल्या वर्षीही चालू व थकबाकीची अशी एकूण ५२ कोटी रुपये वसुली झाली होती. यंदा चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४५ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षाचा आकडा गाठण्यासाठी आणखी ८ कोटींची वसुली करावी लागणार आहे. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

थकबाकीदारांच्या बँकेच्या खात्यांची माहिती मागवली
महापालिकेने प्रभाग समितीनिहाय १०० असे एकूण ४०० बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. दरवर्षी जप्तीची कारवाई केली जाते; परंतु त्यानंतर न्यायालयीन वाद निर्माण होतात. सध्या पालिकेच्या तिजोरीत कशा पद्धतीने कराची रक्कम जमा होईल यासाठी भर दिला जातो आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे बँक खाते सील करून खात्यातील थकबाकीची रक्कम पालिकेकडे वळते करण्यावर भर दिला जाणार आहे. ही कारवाई मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. व थकबाकीची अशी एकूण ५२ कोटी रुपये वसुली झाली हाेती. यंदा चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४५ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षाचा आकडा गाठण्यासाठी आणखी ८ कोटींची वसुली करावी लागणार आहे. जास्तीत जास्त वसुली हाेऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

गाळेधारकांकडे १६५ कोटी थकबाकी, वसुलीसाठी प्रयत्न
वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित न झाल्याने थकबाकीचा आकडा ३०० कोटींवर पोहोचला आहे. दोन वर्षांत कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न झाल्याचे दिसते; परंतु वर्षानुवर्षे आकडा फुगत राहिल्याने मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा ८५ कोटींपर्यंत पोहोचला. याशिवाय खुला भूखंड कराची थकबाकी ४० कोटी आहे. तर घरकुल धारकांकडे १६ कोटी रुपये, गाळेधारकांकडे १६५ कोटींची थकबाकी असून, थकबाकीचा आकडा आता ३०१ कोटी रुपयांपर्यंत वाढलेला आहे.

थकबाकीदारांना शास्तीत सूट
यंदा नाेव्हेंबर ते फेब्रुवारी ही योजना राबवली. जुन्या थकबाकीदारांकडील शास्तीची ४ कोटी रक्कम माफ झाली. तर ७ कोटी मनपा तिजोरीत जमा झाले. कर थकबाकीवरील शास्तीत ५० टक्के तर खुला भूखंड कर थकबाकीवरील शास्तीत शंभर टक्के माफी देण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अभय योजना लागू आहे.

बातम्या आणखी आहेत...