आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरवठा:मनपाचे ‘हम नही सुधरेंगे!’ 100पेक्षा जास्त क़ॉलन्यांमध्ये पिवळ्या पाण्याचाच पुरवठा ; दोन दिवसात पाण्याची समस्या सोडविण्याचा मनपाचा दावा ठरतोय फोल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसात शहरातील पिवळ्या पाण्याची समस्या सुटेल असे सांगणाऱ्या महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत पाणीपुरवठा झालेल्या १०० पेक्षा जास्त कॉलन्यांमध्ये दूषित पाणी पुरवठा झाला आहे. रिंगरोडपरिसरात अक्षरश: गटारीतील घाण पाणी आले आहे तर शनिपेठेसह परिसरात पिवळ्या पाण्यात जंत आढळले. त्यामुळे जळगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामागील मूळ कारणांचा शोध घेण्यापासून प्रशासन पळ काढत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात चिंता असते ती पाण्याची. नेहमीपेक्षा जास्त वापर असल्याने पाणी पुरवठ्याच्या दिवशी नागरिक हातचे काम सोडून पाण्यासाठी घरी थांबून राहतात. त्यात गुरूवारी झालेल्या दुरूस्तीच्या कारणासाठी पालिकेने एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकलला हाता. त्यामुळे शहरातील अनेक घरांमध्ये मोठी समस्या निर्माण झाली हाती. सलग तीन दिवसांनी पाणी मिळणार या आशेने शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून अलर्ट असलेल्या नागरिकांच्या नशिबी मात्र निराशा आली आहे. अनेक घरात सुरूवातीला दूषित पाणी येत असल्याने पाणी गटारीत सोडून देण्यात आले; परंतु पुरवठ्याची वेळ संपायला आली तरी पाण्याच्या गुणवत्तेत कोणताही बदल झालेला नसल्याने नागरिकांचा नाईलाज झाला. जलवाहिनीतील क्षार उसळल्याचा दावा : दोन दिवसाआड हाणारा पाणीपुरवठा तीन दिवसांनी झाला. त्यामुळे संपूर्ण शहरातील जलवाहिनी कोरडी झाली हाती. तापमानात गरम झालेल्या लोखंडी व पीयूसी पाइपामधील क्षार पाण्याच्या प्रवाहात आल्यामुळे पाण्याचा रंग बदलला असावा असे कारण पाणीपुरवठा अभियंता गोपाळ लुले यांनी सांगितले. दरम्यान, गढूळ पाण्याबाबत मात्र पाणीपुरवठा विभागाने हातवर करत जलवाहिनी गळती झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. दोन दिवसांनी परिस्थिती पूर्वपदावर येईल असा दावा करणारे पालिका प्रशासन पिवळे पाणी रोखण्यात अपयशी ठरले आहे. हा जळगावकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आहे. पालिकेने समस्येच्या मुळाशी जावून कारण शोधण्याची गरज आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे जार विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आल्याचे भाजप नगरसेवक धीरज सोनवणे यांनी सांगितले. व्हॉल्व्ह खराब झाल्याने चार तास लांबला पुरवठा : दिवसभर अशुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू असताना गिरणा टाकीजवळील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी व परिसरात सायंकाळी सहा वाजता होणारा पाणीपुरवठा रात्री दहा वाजता झाला. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्याने रात्री एक वाजेपर्यंत म्हणजे चार तास वितरण लांबले होते. त्यामुळे नागरिक ताटकळले होते.

गळती नसतानाही गढूळ पाणी रिंगराेड परिसरातील अनेक काॅलन्यांमध्ये सकाळीच पुरवठा केला जाताे. टागाेरनगर, हरेश्वर काॅलनी, गणेश काॅलनी, रिंगराेड परिसरात शुक्रवारी पुरवठा झाला. अनेक भागात पावसाळ्यात मिळणारे गढूळ पाणी आले तर काही भागात दुपारी १२ वाजता पिवळ्या रंगाचा पुरवठा झाला. रिंगराेड परिसरात आलेल्या पाण्याची साठवणूक करण्याची देखील स्थिती नसल्याने अनेकांनी पाणी भरणेच टाळले. नगरसेविक दीपमाला काळे यांनी अभियंता संजय नेवे यांच्याशी संपर्क करून गळती लागल्याची शंका व्यक्त केली; परंतु परिसरात कुठेही गळती नसल्याने थेट जलकुंभातूनच गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहेे.

बातम्या आणखी आहेत...