आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्धवट जळत आहेत प्रेत:चोपडा नगरपालिकेच्या स्मशानभूमीत सरणाअभावी अर्धवट जळत आहेत प्रेत, स्थानिक शिवसेना नेत्याने उपस्थित केले प्रश्न

प्रविण पाटील, चोपडा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरेसे सरण नसल्याने अर्धवट अवस्थेत जळालेले रुग्णाचे प्रेत.

चोपडा पालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पुरेसे लाकडे ही उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह अर्धवट जळताना दिसून आली अाहेत. दरम्यान, शिवसेनेचे शहरप्रमुख आबा देशमुख, नगरसेवक महेश पवार व त्यांच्या मित्रपरिवाराने अर्धवट जळालेल्या मृतदेहांवर पुन्हा अंत्यसंस्कार केले. येथील कस्तुरबा शाळेमागे असलेल्या स्मशानभूमीत २६ रोजी सकाळी ११ वाजता चार प्रेत एकाच वेळी जळत हाेती. त्याच ठिकाणी दोन मृतदेह शेवटच्या अंत्यविधीसाठी प्रतीक्षेत होती. तर जळणाऱ्या चार प्रेतांपैकी एक मृतदेह सरणाअभावी अपूर्ण जळाले हाेते. दरम्यान, नगरसेवक महेश पवार हे त्यांच्या एका नातेवाईकांना अंत्यविधीसाठी तेथे आलेले हाेते. तेथे लाकडांअभावी प्रेत जळत असल्याचे भयावह चित्र त्यांना पहायला मिळाले.

या वेळी शिवसेना शहर प्रमुख आबा देशमुख यांनी पालिकेच्या कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. स्मशानभूमीत बोलताना ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला त्यांनी सांगितले की, आज पालिकेच्या स्मशानभूमीत अत्यंत वेदनादायी चित्र पाहायला मिळाले. माझे मित्र नगरसेवक महेश पवार यांच्या काकांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर आम्ही 8 ते 10 जण अंत्यविधीसाठी पालिकेच्या स्मशानभूमीत गेलो हाेताे. तेथे लाकडांअभावी माणसे अर्धवट जळाल्याचे स्वतः पाहिले. याकडे पालिकेचे पूर्णत दुर्लक्ष असून मुख्याधिकारी, नगराध्यक्षा मनीषा चौधरी व जीवन चौधरी अाहेत कुठे?

स्मशानभूमीत लाकूड पुरवण्याचा ठेका दिला आहे, तो कुणाचा? जर येथे लाकूड द्यायचे नसेल तर मग स्मशानभूमीत प्रेत जाळणे बंद का करत नाही? असा सवाल उपस्थित करून पालिकेच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, स्मशानभूमीत किशोर पवार यांच्याकडे मृत लोकांवर अंत्यविधीची जबाबदारी दिली अाहे. त्यांनी सांगितले की, येथे शेवटच्या क्षणी मृत माणसासाठी चार मन लाकूड देऊ शकत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पालिकेचा खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही आबा देशमुख म्हणाले.

नातेवाइकांनी परस्पर जाळला मृतदेह
कालपर्यंत तेथे लाकूड शिल्लक नव्हते. जी होती ती माेठी होती. काल लाकडासाठी संबंधित ठेकेदार दहिवेलकर यांना फोन केला होता, त्यानुसार ते देणार होते. पण काल रविवार असल्याने त्यांच्याकडे माणसे नसल्याने लाकडे पोहोचली नाहीत. म्हणून त्यांनी आज साडेअकरा वाजता लाकूड आणून दिली. जे सरन अभावी प्रेत जळत होते, ते संबंधित नातेवाइकांनी परस्पर जाळून टाकले आहे. रुग्णालयातून एकाच वेळी सर्व प्रेत आल्याने गडबड झाली. नीलेश ठाकूर, सहायक कार्यालयीन निरीक्षक

मृताला घ्यायला येईनात नगरपालिकेचे कर्मचारी
कोरोनाने मृत रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयातून पालिकेचे कर्मचारी अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत घेऊन जातात. आज सकाळी नऊ वाजेपासून ते साडेदहा वाजेपर्यंत रुग्णालयात पाच रुग्ण दगावले. अंत्सयसस्काराची तयारी झालेली असताना ही त्यांना घ्यायला कोणी येत नव्हते. म्हणून पालिकेचे गटनेते जीवन चौधरी यांना फोन केला. त्यानंतर १० मिनिटांनी ते कर्मचारी आले आणि तेथून मृताला घेवून गेले, असेही आबा देशमुख यांनी सांगितले. आजच्या घटनेचे वास्तव फोटो व व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...