आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्याख्यानात समुपदेशक डॉॅ. अविनाश सावजी यांनी दिला सल्ला

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच वेळेचे नियोजन करावे. वेळेचे काटेकाेर नियोजन व योग्य साधनांची निवड केल्यास ध्येय प्राप्ती निश्चित होते, असा माेलाचा सल्ला अमरावती येथील प्रयास सेवांकुर संस्थेचे समुपदेशक डॉ.अविनाश सावजी यांनी येथे केले.

भुसावळ शहरातील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या अहिल्यादेवी कन्या विद्यालयात व्याख्यान झाले. व्यासपीठावर भुसावळ श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते. उपस्थित होते. प्रकाश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय आशिष सैतवाल यांनी करून दिला. महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...