आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:कर्जाचा डोंगर वाढल्याने दांपत्याचा गळफास, कळंबमधील नायगावची घटना; तरुणाच्या आईने फोडला टाहो

कळंब3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नायगाव येथील एका तरुण दांपत्याने राहत्या घरात एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना खासगी कर्जाच्या चिंतेने घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. परंतु, नापिकीमुळे कर्जाचा डाेंगर वाढत राहिला व दांपत्याने आत्महत्या केल्याचे सांगत मृत तरुणाच्या आईने टाहो फोडला.

नायगाव येथील प्रकाश वसंत पोतदार (३०) व पत्नी अश्विनी पोतदार (२६), असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव असून, लोकांचे खासगी कर्ज फेडण्यासाठी चार एकरपैकी दीड एकर जमीन विकल्यामुळे प्रकाश आणि अश्विनी यांच्यात वाद होत होता, असे सांगण्यात येत आहे. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, कर्जावरुन पती-पत्नीमध्येही जमीन विक्री व खासगी देण्यावरून खटके उडत होते, असा संशय व्यक्त होत आहे. त्यातूनच दांपत्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

चार एकरपैकी तरुणाने दीड एकर जमीन विकली
घटनेनंतर शोक व्यक्त करत लेकराने व सुनेने नेहमीच्या नापिकीमुळे स्वतःचा जीव दिला, असा आर्त टाहो प्रकाश यांच्या मातोश्रीने फोडला होता. प्रकाश हा अल्पभूधाक शेतकरी कुटुंबातील असून, वडिलांचे छत्र हरवल्यानंतर परिवाराची सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. कोरडवाहू शेतीतून उत्पन्न तर सोडाच कुटुंबाचा प्रपंचही चालवणेही त्याला कठीण झाले होते. सततच्या नापिकीमुळे प्रकाशने चार एकर जमिनीपैकी दीड एकर जमीन विकली होती.

बातम्या आणखी आहेत...