आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:मास्क न लावल्याने भाजीपाला विक्रेतेला दंड करून न्यायालयाने शिक्षा सुनावली; शहरातील दुसरी घटना

नवापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मास्कचा वापर न केल्याने जहांगीर मिर्झा नंतर अश्फाक अत्तरला शिक्षा

शहरातील रंगावली नदी किनारी भाजीपाला मार्केटमध्ये कांदे-बटाटे विक्री करत असताना तोंडाला मास्क न लावता बेजबाबदारीने भाजीपाला विक्री करत असल्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या निदर्शनात आल्याने, त्याला मास्क लावण्यासाठी सुचना केली तरी मास्क न लावल्याने अश्फाक मुस्ताक अत्तर (वय 22 रा.राजीव नगर) याचावर नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवापूर न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने युवकाला एक हजार रुपयांचा दंड व पाच दिवसांची शिक्षा सुनावली आहे. त्याची नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.

कोरोना संकटाचा सामना करण्याकरिता लॉकडाउन करून संचारबंदी लागू केली आहे. अशा स्थितीत आवश्यक उपाययोजना न करणा-या बेजबाबदार नागरिकांना वेगवेगळ्या शिक्षा ‘आॅन दि स्पॉट’ दिल्या जात आहेत नवापूर शहरात दोन युवकांना कडक शिक्षा झाल्याने इतरांवर त्याचा परिणाम दिसत आहे. नगर पालिकेच्या नगराध्याक्षा हेमलता पाटील यांनी भाजीपाला मार्केट मधील विक्रेते यांना वारंवार सुचना केल्या आहेत.मास्क लावणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे.तरी देखील काही भाजीपाला विक्रेते व नागरिक स्वतःची व इतरांची जीवाची परवा न करता बेजबाबदारीने वागत आहे. कोरोना संदर्भात नागरिकांनी जागृत राहावे विनाकारण घराबाहेर पडू नये, पालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन पालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी केले आहे.

शहरात पहिली शिक्षा जहांगीर मिर्झा ला

शहरातील पोलिस पेट्रोलिंग करत असताना शास्त्री नगर भागात राहणार युवक जहांगीर उस्मान मिर्झा (वय 24) लाईट बाजारात मास्क न लावता विनाकारण फिरत असताना पोलीसांनी मास्क लावण्यासाठी सांगितले परंतू पोलीसांचे न ऐकता जहांगीर मिर्जा या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून नवापूर न्यायालयाने एक हजार रुपये दंड व पाच दिवसाची कोठडीची शिक्षा दिली होती.

पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांची सिंगम स्टाईल 

नवापूर शहरातील लाईट बाजार,मसोळी मार्केट, भाजीपाला मार्केट,बस स्टँड परिसर, गांधी पुतळा, कॉलेज रोड परिसरात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत रस्त्यावर उतरून सोशल डिस्टन्सचे पालन न करणे मास्क न घालणे, विनाकारण मोटरसायकलीवर फिरणे यांची चांगलीच धुलाई केली.काहींवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने नवापुर शहरांमध्ये काही प्रमाणात शिस्त लागेल व येणाऱ्या दिवसात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल मास्क घालण्याची सवय लागेल सोशल डिस्टन्स पालन केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...