आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:चुलत भावाने वृद्धेची केली 10 लाखांत फसवणूक; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पतीच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून प्लॉट घेण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने चुलत भावाने दोन मित्रांच्या मदतीने एका वृद्धेची १० लाख २१ हजार रुपयांत फसवणूक केली. कच्ची सौदा पावती करून अस्तित्वात नसलेला प्लॉट खरेदी करून देत असल्याचे भासवले. तीन वर्षांनंतरही खरेदीखत दिले नाही. त्यानंतर वृद्धेसह कुटंुबीयांना मारहाणही केली. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली.

आतीश रतनलाल राणा (वय ५१, रा. कोळीपेठ) व संजू शिवराज परदेशी (वय ४५, रा. मायादेवीनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार अरविंद यशवंत बाऊस्कर (रा. यशवंत कॉलनी) हा बेपत्ता आहे. जगराणीबाई अमृतलाल मुराई (वय ६५, रा. वरणगाव) यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी तिघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, रतिलाल पवार, इम्रान सय्यद, मुकेश पाटील, मुदस्सर काझी यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...