आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरातील ही तिसरी दरवाढ:गायीचे दूध आजपासून दाेन रुपयांनी महागणार

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लंपी आजारामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. जिल्हा दूध संघाला दरराेज ३० हजार लिटर दूध खासगीतून खरेदी करावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर संघाने दुधाचे भाव दाेन रुपये लिटरने वाढवले आहेत. वर्षभरातील ही तिसरी दरवाढ आहे.

दूध संकलनात घट, ताेटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ केली असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. सर्व प्रकारचे दूध प्रति लिटर दाेन रुपयांनी महाग हाेणार आहे. ही दरवाढ बुधवारपासून लागू हाेईल. त्यामुळे दरमहिन्याला एक लिटर दूध घेणाऱ्या ग्राहकाच्या बजेटमध्ये ६० रुपयांची वाढ हाेईल. नवीन लागू हाेणाऱ्या दरानुसार जिल्हा दूध संघातून विक्री केले जाणारे गाेल्ड दूध ६४ रुपये प्रतिलिटर, म्हशीचे प्रमाणित दूध ५४ रुपये प्रतिलिटर तर गायीचे दूध ५२ रुपये प्रतिलिटर तर टाेन मिल्कचे दर ४६ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...