आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Cricket, Football Increased Walking Stamina; The 12 year old Warakari Is Also In Dindigul, Along With His Half aged Grandmother |marathi News

दिंडी:क्रिकेट, फुटबॉलने वाढवला चालण्याचा स्टॅमीना; डोळ्याने अधू वृद्ध आजीसह 12 वर्षीय वारकरीही दिंडीत

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे ५०० किलोमीटर पायी चालण्यासाठी बळकट शरिराची आवश्यकता असते. एका १२ वर्षाच्या मुलाने पहिल्याच वर्षी दिंडीत सहभाग घेतला. तत्पुर्वी या बालकाने क्रिकेट आणि फुटबॉल खेळून स्टॅमीना वाढवला. धावण्याचा सराव केला. त्यानंतर थेट ७० वर्षीय वृद्ध आजीसोबत दिंडी सर करण्यास सुरूवात केली.

कृष्णा सुरेश चौधरी (वय १२, रा. अमळनेर) असे या बालकाचे नाव आहे. सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेला कृष्णा हा आजी प्रमिलाबाई गुलाब चौधरी (वय ७०) यांच्यासोबत दिंडीत आला आहे. नातू आजीसोबत की आजी नातूसोबत हे मात्र स्पष्ट झाले नाही. कारण प्रमिलाबाई या एका डोळ्याने अधू आहेत. त्यामुळे कृष्णाच त्यांचा हात धरुन पायी चालवत आधार बनलेला असतो.

१५ जूनपासून नातू व आजी यांनी अमळनेर येथील सखाराम महाराजांच्या दिंडीत सहभागी होऊन वारी सुरू केली. शुक्रवारी तिसऱ्या दिवसापर्यंत दोघेही पायी चालले. कृष्णा हा दिंडीतला सर्वात कमी वयाचा वारकरी आहे. प्रमिलाबाई या पहिल्यांदाच वारी करीत असल्याने कृष्णा त्यांचा श्रावणबाळ असल्याच्या भावना सोबत असलेले वारकरी व्यक्त करीत आहेत. दिंडीसोबत पाचोरा येथील डॉ. भूषण मगर (पाटील) फाउंडेशनतर्फे मोफत रुग्णवाहिका व जलसेवा पुरवण्यात येते आहे. दिंडीत असलेल्या वृद्धांच्या पायांना वेदनानाशक मलम रस्त्यावरच लावले जातात.

बातम्या आणखी आहेत...