आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधनाला भावाला राखी बांधली अन्..:विवाहितेने घेतला गळफास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह, सासू-सासऱ्यांवर गुन्हा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील माहेर आलेल्या विवाहितेस सासरच्या लोाकंनी पैशांसाठी छळले. याच छळाकला कंटाळून तीने तीन दिवसांपूर्वी माहेरी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदरील ही घटना मंगळवार (16 ऑगस्ट) उघडकीस आली. यानंतर पतीसह सासरच्या मंडळीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण करून शारीरिक छळ

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील माहेर असलेल्या विवाहिता उमा सनी उमप यांचे लग्न जळगाव शहरातील खंडेरावनगरातील राहणाऱ्या सनी उर्फ खेडू प्रेमनाथ उमप यांच्याशी झाले. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती याने गाडी घेण्यासाठी पत्नी उमा हिला माहेरहुन 50 हजार रूपये आणण्याची मागणी केली. ‘तू जर पैसे आणले नाही तर तु फाशी घेवून मरून जा परत मला तुझे तोंड दाखवू नको’ असे बोलून पती सनी हा तीचा छळ करत होता. मारहाण, शिवीगाळ करत होता. सासरच्या लोकांनी देखील तीचा छळ सुरू केला. या छळाला ती कंटाळली होती. अखेर 10 ऑगस्ट रोजी ती रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 रोजी तीने माहेरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरूवातीला घटनेचे कारण समोर आले नाही. अंत्यविधी झाल्यानंतर माहेरच्या लोकांनी या प्रकरणाचा शोध घेतला.

निव्वळ पैशासाठी केला छळ

पती व सासरच्या लोकांनी गाडी घेण्यासाठी सातत्याने तीच्याकडे पैसे मागीतले होते. यामुळे ती तणावात होती. तसेच पतीने तीला आत्महत्या करुन घे असेही म्हटले होते. याच तणावामुळे तीने आत्महत्या केली असे समोर आले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर अखेर मंगळवारी उमेाची आई रत्नाबाई नानू फाजगे (रा. शेवाळे ता. पाचोरा) यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सनी उर्फ खेडू प्रेमराज उमप, गिताबाई प्रेमनाथ उमप, सासरे प्रेमराज उमप आणि गुड्डी उमप (सर्व रा. खंडेरावनगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...