आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामोद तालुक्यातील खांडवी बस स्थानकावर जळगाव कडून वडोद्याकडे जाणाऱ्या बस मध्ये खांडवी येथील सहा युवकांनी बसमध्ये चढून मुलांसोबत मारहाण करून मुलींची छेड काढली. या प्रकरणी तक्रारीवरून त्या युवकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात शिकणारी तेजस्वी गिरीश पाटील रा. वडोदा तालुका मुक्ताईनगर या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही दिवसापूर्वी जळगाव जामोद ते मुक्ताईनगर बस बंद झाल्यामुळे त्यांनी जळगाव डेपोत बस सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यामुळे वडोदा येथील विद्यार्थ्यांसाठी पावणे पाच वाजता बस सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी वडोद्यासाठी बस लागली असता त्या बसमध्ये खांडवी येथील मुले व मुली बसल्याने आम्हाला बसण्यासाठी जागा नव्हती. यावेळी गावातील धनेश फुसे यांनी मुलींना सांगितले की वाद घालू नका.
परंतु १६ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मी व माझ्या सोबतची मुले व मुली वडोदा जाण्यासाठी जळगाव येथून बस मध्ये बसलो. बस खांडवी येथे बस स्थानकावर थांबली असता तिथे आरोपी विशाल डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रोशन पंढरी डोंगरदिवे, विकास साहेबराव डोंगरदिवे यांच्यासह दोन अनोळखी मुले बस मध्ये चढले. यावेळी त्यांनी धनेश सुनील फुसे यास मारहाण करायला सुरुवात केली. या बाबत त्यांना हटकले असता त्यांनी माझ्यासह प्रणिता तितुर हिला सुद्धा मारहाण करून तसेच वाईट उद्देशाने अंगाला हात लावून छेडछाड केली. तसेच वडोदा जाणारी एसटी बस खांडवी वरून जाऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.