आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाकडे अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार:गाेळीबार प्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाकडे अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार केल्याच्या कारणावरुन रविवारी रात्री गाेळीबार करण्यात आला. या प्रकरणी साेमवारी पंकज ढेके व किरण खर्चे या दाेन संशयितांविरुद्ध भगवान साेनार यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पाेलिसात गुन्हा दाखल झाला आहे. टाॅवर चाैक ते चाैबे शाळेदरम्यान असलेल्या अतिक्रमणाबाबत शिवाजीनगरातील भगवान काशिनाथ साेनार यांनी तक्रार केली हाेती. रविवारी रात्री ११.३० वाजता जीएस मैदानाच्या मुख्य गेटसमाेर तक्रारदार भगवान साेनार याला पंकज ढेके याने तक्रार केली असे म्हणून मारहाण केली. त्यासाेबत असलेल्या किरण खर्चेने हातातील बंदुकीने फायर केले. या वेळी भगवान साेनार हा आरडाआेरड करून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेकडे पळाला. त्याच्या मागे ढेके व खर्चे हे दाेन्ही पळाले. स्टेडीयम चाैकात दुसरा गाेळीबार करून आंधाराचा फायदा घेवून पलायन केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर शहर व जिल्हापेठचे पाेलिस जीएस मैदानावर सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी आले हाेते.

गाेळीबाराची घटना मैदानाबाहेर घडल्याचा केला दावा जीएस मैदानावर काेळी समाज बांधवांतर्फे समाजाच्या काेळी क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. गाेळीबाराची घटना ही मैदानावर घडलेली नाही. ती मैदानाबाहेर, स्टेटबॅकेजवळ घडली आहे. या घटनेचा काेळी समाज क्रिकेट लीगशी संबध नसल्याचा दावा लीग समितीतर्फे पत्रकाद्वारे केला आहे.

बातम्या आणखी आहेत...