आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात वाढती 'भाई'गिरी:सराईत गुन्हेगारास पिस्तूलच्या जोरावर दहशत पसरवताना अटक; जळगाव पोलिसांची धडक कारवाई

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिपेठेतील कोळीपेठ राहणारा एक सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. हा गुन्हेगार पिस्तूलचा धाक दाखवून दहशत परसवत होता.

सागर सुरेश सपकाळे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सागरच्या विरुद्ध यापूर्वी पिस्तूलचा धाक दाखवून हाणामारी केल्याचे दोन गुन्हे दाखल आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तो संशयित आहे. रविवारी दुपारी तो पिस्तूलचा धाक दाखवून परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय श्यामराव पाटील, प्रितम पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांच्या पथकाने कोळीपेठ परिसरात गस्त केली. यावेळी एका पानटपरीजवळ सागर आढळुन आला. अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल मिळुन आली. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. सागरच्या विरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांवर गुन्हे दाखल

सागरसह त्याचा भाऊ या दोघांवर शनीपेठ पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशात सागराकडे पिस्तुल, चार जिवंत कडतुस मिळून आल्यामुळे पोलिस सतर्क झाले आहेत. त्याने पिस्तुल कुठून व का आणले याचा तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...