आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी दाेन्ही बाजुच्या संपूर्ण पॅनलचे पर्याय नाकारत बहुतांश मतदारांनी वैयक्तीक उमेदवारांची निवड करीत ‘क्राॅस वाेटिंग’ केले आहे. बिनविराेध झाल्याने स्थानिक उमेदवार नसलेला पाचाेरा आणि भडगाव, चाळीसगाव या तालुक्यातील मतदार या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचा अंदाज आहे. ‘दिव्य मराठी’च्या चमुने या निवडणुकीशी संबंधित पाच टक्के मतदार, मतदारांची जबाबदारी असलेले राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, उमेदवारांशी संवाद साधला. त्यात या बाबी समाेर आल्या.
दूध संघाच्या निवडणुकीत एकुण ४४१ मतदार आहेत. या सर्व मतदारांनी शनिवारी मतदानाचा हक्क बजावला. रावेर लाेकसभा मतदारसंघात असलेल्या तालुक्यांत क्राॅस वाेटिंगमध्ये मंदाकिनी खडसेंच्या बाजुने काैल आहे. तर जळगाव लाेकसा मतदारसंघात हीच स्थिती आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजुने आहे. परंतु, त्यात पाचाेरा, भडगाव आणि चाळीसगाव या तीन तालुक्यातील मतदारांचा काैल काेणाकडे? याचा अंदाज दाेन्ही पॅनलच्या उमेदवारांना नाही. या तालुक्यातील मतदारांचे मतदान खडसे की चव्हाण? हे ठरवणार असल्याचे मत मतदारांनी व्यक्त केले आहे.
या निवडणुकीत बिनविराेध निवडून आलेले पाचाेऱ्याचे दिलीप वाघ यांची भूमिका मतदानापर्यंतही स्पष्ट हाेवू शकली नाही. त्यामुळे पाचाेऱ्यातील मतदारांचा काैल काेणाकडे ही बाब निर्णायक असल्याचे मानले जाते आहे. मंदाकिनी खडसे आणि आमदार मंगेश चव्हाण यांना इतर तालुक्यात किती मते मिळू शकतात याचा अंदाज असला तरी भडगाव आणि चाळीसगावात मिळणारी मतेच निर्णायक ठरणार असल्याचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दाेन वाजेपर्यंत ९५% मतदान
निवडणुकीत ४४१ मतदार असल्याने सकाळी १२ वाजेपर्यंतच ६० टक्के मतदान झालेे. दुपारी २ पर्यंत एकूण ९५ टक्के मतदान झाले हाेते. अमळनेरमध्ये दाेन वाजता ७८ पैकी ७७ मतदान झाले.
दहा वाजेपर्यंत निकाल
जळगाव शहरातील सत्यवल्लभ हाॅल येथे रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतमाेजणीची प्रक्रिया सुरू हाेणार आहे. सकाळी १० वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल लागू शकताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.