आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी प्रवेशाची लगबग सुरू:गुणपत्रक हाती पडताच महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी; जळगाव जिल्ह्यात 26 हजार जागा

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल 8 जूनला जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गुणपत्रकांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे शनिवारपासून प्रथम वर्ष पदवी प्रवेशाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.

प्रवेशासाठी लगबग

निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करुन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात प्रवेशाला शनिवारपासून सुरवात झाली. प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन होणार असल्याने विद्यार्थ्यांची पहिल्याच दिवशी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना कसरत दिसून आली.

विद्यार्थ्यांची गर्दी

जळगाव जिल्ह्यात प्रथम वर्ष प्रवेशासाठी 104 महाविद्यालयात 25 हजार 976 जागा उपलब्ध आहे. तसेच जागा कमी व विद्यार्थी संख्या अधिक असल्याने प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती.

पदवीकडे ओढा

कोरोनामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे असणारा कल देखील कमी झाला आहे. त्यामुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमापेक्षा पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. शहरातील मु. जे. महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, जी.डी.बेंडाळे महाविद्यालय यांसह अन्य महाविद्यालयांमध्ये देखील शनिवारी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळाली.

अशा आहेत जागा

शाखामहाविद्यालयेजागा
कला3912,734
वाणिज्य295,995
विज्ञान367,247
बातम्या आणखी आहेत...