आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर:सीएसआयआर नेट परीक्षा; ऑनलाइन निकाल जाहीर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान शाखेतील प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी आणि संशोधन शिष्यवृत्तीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात सीएसआयआर नेट परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला.

देशभरातील सुमारे १ लाख ६२ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. सप्टेंबर २०२२मध्ये झालेली ही परीक्षा सीएसआयआर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जून २०२२च्या सत्राची परीक्षा होती.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या माध्यमातून देशभरातील १६६ शहरात ही परीक्षा झाली होती. यात सर्वाधिक विद्यार्थी हे जीवन विज्ञानाशी निगडित होते. तब्बल १ लाख २० लाख हजार विद्यार्थी कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्तीसाठी इच्छुक होते. विद्यार्थ्यांचा निकाल csirnet.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...