आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेदिक रोपांचे रोपण:व्यसनमुक्ती केंद्रात औषधी राेप लागवड; जडीबुटीदिनी वृक्षाराेपणात पटवून देण्यात आले महत्त्व

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला पतंजली योग समितीतर्फे गुरुवारी चेतना व्यसनमुक्ती केंद्रात जडीबुटी दिनी आयुर्वेदिक रोपे लावून त्यांना ट्री-गार्डचे संरक्षण देण्यात आले. यावेळी आयुर्वेदिक राेपे आराेग्यासाठी किती फायदेशीर आहे हे पटवून देण्यात आले.

कार्यक्रमात आयुर्वेदिक रोपांचे रोपण महापौर जयश्री महाजन, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते, जिल्हा प्रभारी मनीषा पाटील, नेहा जगताप, वृक्ष संवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर साधकांना आयुर्वेदिक रोपांचे वाटप करण्यात आले. यात अडुळसा, बेहडा, चिंच, आवळा, जांभूळ, काशीद, करंज, गुलमोहाेर, पिंपळ व इतर आयुर्वेदिक झाडांचे रोपण या निमित्ताने करण्यात आले. तसेच साधकांना आराेग्यासाठी प्रत्येक राेप किती महत्त्वाचे आहे, त्यांचा फायदा काय आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...