आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिरे, हळद, तिखट 25% महागले, भाववाढीचा ठसका; गृहिणींना काटकसर करावी लागणार

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

खाद्यतेल पाठोपाठ मसाल्याचे दरही वाढले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्के दरवाढ झाली आहे. हळद, जिरे, धणे, लवंग, बडीशेप, लाल तिखटाच्या भावातही वाढ झाली. नोव्हेंबर, डिसेंबरात झालेल्या अवकाळी पावसाने मसाले, मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने दर वाढले आहेत. नव्या मालाची आवक झाल्यावर भाव कमी होतील.

देशातील विविध भागातून मसाल्याचे उत्पन्न घेतले जाते. तसेच सिंगापूर, इंडोनेशिया या ठिकाणांहूनही फूल, धने आणि जिरे आयात केले जाते.

नोव्हेंबर, डिसेंबरमधील अवकाळी पावसाचा परिणाम
मसाला पीक काढण्याच्या तयारीत असताना नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने घोळ केला. काढणीवर आलेली मिरची पावसाने खराब झाली. मिरचीच्या आतील भाग पाण्याने काळवंडल्याने हे पीक फेकून देण्याची वेळ आली. मिरचीसह अन्य मसाला पिकांचीही हीच स्थिती होती. पुरवठा कमी झाल्यामुळे बाजारात मिरचीसह अन्य मसाल्यांचा तुटवडा निर्माण होऊन मसाल्याचे दर वाढले असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मिरचीवरही पावसाचा परिणाम झाला. त्यामुळे हिरवी मिरची १०० रुपयांपर्यंत पोहोचली.

मसाले विक्री यंदा नेहमीपेक्षा आली निम्म्यावर
मसाल्याच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्के भाववाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळेही उत्पादनावर परिणाम झाला. लग्नसराई व वर्षभरासाठी मसाला घेणाऱ्या ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे मसाले विक्री यंदा नेहमीपेक्षा निम्म्यावर आली . शांताराम नावरकर, मसाले विक्रेता, जळगाव

मसाल्याचे किलोचे दर
जिरे २५० ते २७०
धणे १४० ते २४०
शेप १८० ते २२०
हळद १८० ते २००
लवंग ८०० ते १०००
मिरे ६०० ते १२००
बाजा ८०० ते ९००
दालचिनी ६०० ते ७००
विलायची १३०० ते १४००
वेलदोडा १७०० ते २२००
तिखट २४० ते ४००