आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाजनांची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका:सध्या सूडाचे राजकारण; आमदारांच्या गाड्यांवर हल्ले होत असल्याने सीएमनेही काळजी घ्यावी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात सूडाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळजी घ्यावी. आमदारांच्या घर आणि गाड्यांवरही हल्ले होत आहेत असा अप्रत्यक्ष टोला विरोधकांना लगावत मंत्री गिरीश महाजन यांनी अशा स्थितीत अती महत्वाच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असा सल्लाही दिला आहे.

काय म्हणाले महाजन?

महाजन म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीवरून शासन गृहखाते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दक्षता घेत आहेत. आवश्यक काळजी घ्यावी त्यापेक्षाही जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सध्या प्रॅक्टीकल वागणूक सुरू आहे. हल्ले असो, दगडफेक असो किंवा हात उचलून मारहाण करण्यापर्यंत प्रकार घडत आहेत, त्यामुळे व्हिव्हिआयपींनी अधिक काळजी घ्यावी.

अमित शहांनी चौकशी करावी- राऊत

शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विनंती की, उच्चस्तरावर धमकी प्रकरणाची चौकशी करा आणि ती चौकशीही उघड करावी. महाराष्ट्राच्या जनतेलाही कळू द्या की, धमकी देणारे कोण आहेत.

मला कुणी रोखू शकत नाही

मुख्यमंत्री शिंदे यांनी धमकीच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, पोलिस आपले काम करीत आहे. पोलिसांनी आणि गृहविभाग दक्ष आहे. मी जनतेतील माणूस आहे आणि मला जनतेत जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

सीएम हिटलिस्टवर- केसरकर

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यांना आम्ही नेहमी सांगतो की, सुरक्षा सोडून जाऊ नका. योग्य ती काळजी घेतली जात असून दक्षताही पोलिस प्रशासन तथा गृहविभाग घेत आहे.

हा कट असू शकतो- दरेकर

मुख्यमंत्र्यांच्या धमकीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, हिंदुविरोधी प्रवृत्ती डोके वर काढत असून सध्या राज्यात अशांवर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळेच भयभीत होऊन ते अशा प्रकारचे कट रचत आहेत की काय हे पाहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...