आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलीकडे आपला सर्व ज्या वाईट, चुकीच्या गोष्टी आहेत त्या स्वीकारण्याकडे कल असतो. दैनंदिन जीवन जगण्यासाठी आगमशास्त्रात मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. ‘उणोदरी’ संकल्पनेचा त्यात समावेश आहे. आपलं पोट जितक्या अन्नाने भरते त्यापेक्षा कमी भोजन करणे म्हणजे ‘उणोदरी’ होय. जो जास्त खातो तो अल्पायुषी ठरतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी उणोदरी स्वीकारायला हवी, असा सल्ला आचार्य पार्श्वचंद्र यांनी दिला. जळगावात सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचनात ते बाेलत हाेते.
जयेंद्रमुनी म्हणाले की, जगातला प्रत्येक जीव जगण्याची अभिलाषा बाळगून असतो. मृत्यू कोणालाच आवडत नाही. सगळ्यांना जगणे आवडते. मानव व इतर प्राणी सुखाची लालसा बाळगून असतात. ‘मी सुखी बनेल’ व ‘मी सुखी राहील’ ह्या दोन गोष्टी मोलाच्या ठरतात. सुखी राहण्यासाठी प्रत्येक जीव आयुष्यभर झटताे. प्रत्येक जीव सुखाच्या मागे धावत असतो. जीवन जगताना छोट्या-छोट्या गोष्टींची सवय आपण लावून घेतो. ‘तुम्ही मोबाइल वापरता, त्याचा फायदा तुम्हाला किती होतो ते तुम्हाला ठाऊक आहेच. पितळी भांड्यांत जर लोणचे बराच वेळ ठेवले, तर त्याचा रासायनिक परिणाम होतो. ते खाण्यात आले तर त्याचा दुष्परिणाम शरीरावर होत असतो. या सगळ्या गोष्टींचे अवश्य भान ठेवले पाहिजे. आगम ग्रंथात जे सांगण्यात आले आहे, त्याचा अवलंब करावा, असे आवाहन पार्श्वचंद्र यांनी केले.
आज घरेलू हिंसा, विवेक विषयावर विशेष प्रवचन
चातुर्मास प्रवचनात रविवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत ‘घरेलू हिंसा व विवेक’ या विषयावर डॉ. पदमचंद्रमुनी यांचे विशेष प्रवचन होईल. जास्तीत जास्त समाजबांधवांनी कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.