आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:नगरसेवक अपात्रतेच्या अपिलात रोज कामकाज

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील भाजप व बंडखोर यांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या अपिलात आता दररोज सुनावणी घेण्यात येणार आहे. शुक्रवारी तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली. अजून १३ जणांची साक्ष नोंदवली जाणार आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंनी १९ नगरसेवकांना नोटीस काढत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार शुक्रवारी तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. अपिलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आता दोन्ही गटाकडील नगरसेवकांची साक्ष नोंदवण्याचे काम सुटीचे दिवस वगळता दररोज केले जाणार आहे. त्यामुळे अपात्रतेच्या प्रकरणात विभागीय आयुक्तांकडील काम आठवडाभरात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...