आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात बुधवार व गुरुवार या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल २ हजार ४२४.१३ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानग्रस्त झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारच्या वादळी पावसाने ३९८ तर गुरुवारच्या पावसाने २०२६. १३ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले असून त्यात सर्वाधिक २ हजार ११.१३ हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचे आहे. जिल्ह्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रावेर, मुक्ताईनगर, जामनेर व पाचोरा या चार तालुक्यातील ३९८ हेक्टर क्षेत्रावरील केळी पीक भूईसपाट झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. यात रावेर तालुक्यात ५०४ शेतकऱ्यांचे ३४५ हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांचे २० हेक्टर, जामनेर तालुक्यातील २२ शेतकऱ्यांचे १५ हेक्टर व पाचोरा तालुक्यातील १६ शेतकऱ्यांचे १८ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले.
जळगाव, धरणागाव, चोपडा येथे नुकसान गुरुवारी अवकाळी पावसामुळे चोपडा, धरणगाव, जळगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील केळी, पपई व लिंबू फळ पिकांचे २०२६.१३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. केळी २०११.१३ हेक्टर, पपई ५ हेक्टर, लिंबू बाग १० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
वादळाने केळीचे सर्वाधिक नुकसान गुरुवारच्या वादळी पावसाने केळी पिकाचे सर्वाधिक २ हजार ०११.१३ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक जळगाव तालुक्यात १ हजार ४२६ हेक्टर, चोपडा तालुक्यात ५१७ हेक्टर, भडगाव ३४.३३ हेक्टर, पाचोरा १८.८० हेक्टर, धरणगाव तालुक्यात १५ हेक्टरवरील केळी पिक उद्ध्वस्त झाले आहे.
नुकसानग्रस्त क्षेत्राचे तत्काळ पंचनाम्यांचे दिले आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागातील यंत्रणेला तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.