आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका:महामार्गावर डांबरमिश्रित खडी सांडल्यामुळे धोका

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरातच शहरातून जाणाऱ्या महामार्गाची गुणवत्ता खराब असल्याची बाब वारंवार पुढे येत आहे. महामार्गावर आधीचे खड्डे बुजवले जात नाही ताेच आता नवीन समस्या उभी राहिली आहे. शहरातील रस्त्यांची कामे करण्यासाठी महामार्गावरून वाहणाऱ्या डंपरला गळती लागल्याने डांबरमिश्रीत खडी सांडून महामार्ग अधिक आेबडधाेबड झाला आहे.

शहरात तसेच आजुबाजुच्या परिसरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने डांबरमिश्रित खडीचे डंपर महामार्गावरून वारंवार ये-जा करतात. त्यातून ही खडी थेट रस्त्यांवर सांडते आहे. डंपर परत जात असताना डंपरच्या मागे फालक बंद केलेले नसल्याने ही खडी परतीच्या मार्गावर अधिक प्रमाणात सांडते आहे. गेल्या आठवड्यापासून आकाशवाणी ते खाेटेनगर या रस्त्यावर ही खडी पडलेली आहे. त्यामुळे अपघाताचाही धाेका वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून डांबरमिश्रीत खडी रस्त्यावर पडल्याने ही खडी डांबरी रस्त्याला चिकटली गेल्याने रस्ता खडबडीत झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...