आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाचा अभाव:उस्मानिया पार्क भागात रस्त्यांवर चिखल पथदिव्यांअभावी अंधार; नागरिक हतबल

जळगाव7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शहरानजीक उस्मानिया पार्क परिसरात रस्त्यांवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे चिखल साचला आहे. पथदिवे नसल्याने रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. पंधरा वर्षे झाली तरी महापालिकेडून अपेक्षित सेवासुविधा मिळत नसल्याची ओरड या भागातून होऊ लागली आहे. डीपी रोडवरील उस्मानिया पार्क भागात केजीएन कॉलनी, अलिमियानगर, अबुबकर कॉलनी, गट क्रमांक ४१७, ४१९ हा परिसर येतो.

साधारणत: पंधरा वर्षांपासून येथे रहिवास वाढला आहे. या भागातील नागरिकांनी वेळोवेळी मूलभूत सेवासुविधा मिळाव्या म्हणून महापालिकेकडे मागणी केली. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरवले जात नसल्याने लोकभावना तीव्र आहेत. थोडासाही पाऊस झाला तरी इथल्या रस्त्यांवर जागोजागी चिखल साचतो. खड्ड्यांमुळे तर अनेकांवर जायबंदी होण्याची वेळ येऊन ठेपली. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती या परिसरात निर्माण झाली आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हाडे झाली खिळखिळी
उस्मानिया पार्क भागातील रस्ते खड्ड्यात हरवले आहेत. पावसाळ्यात चिखलाचा तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे वाहने दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. इतकेच नव्हे तर हाडेही खिळखिळी झाली आहेत. पथदिवे बंद असल्याने काळोख पसरलेला असतो. मनपाने सेवासुविधा द्याव्या अशी अपेक्षा आहे. -मुश्ताक करीमी, उस्मानिया पार्क, जळगाव

गटारींची सफाई नाही; आरोग्य आले धोक्यात
मजबूत रस्ते नसल्याने सतत उडणारी धूळ, चिखलामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आवाज उठवूनही महापालिका लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न सतावतो आहे. गटारींचीही साफसफाई वेळेवर होत नाही. कचरा संकलनाचा प्रश्नही दिवसेंदिवस जटील होतो आहे. तो सुटला पाहिजे. - सय्यद नाजीम पेंटर, उस्मानिया पार्क, जळगाव

बातम्या आणखी आहेत...