आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Darkness On The Highway Continues Due To Suspension Of Government Change; Work Stopped By The Contractor Due To Non payment Of Bills| Marathi News

प्रतीक्षा:सरकार बदलातील स्थगितीने महामार्गावरील अंधार कायम; बिले न निघाल्याने कंत्राटदाराकडून थांबले काम

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गावरील पथदिवे लावण्यासाठी नियाेजन समितीने दिलेला तीन काेटी रुपयांचा निधी राज्यातील सरकार बदलानंतर देण्यात आलेल्या स्थगितीमुळे थांबला हाेता. पथदिव्यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम हाेऊनही बिले निघत नसल्याने कंत्राटदाराकडून काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गावरील अंधार आणखी लांबला असून पथदिव्यांच्या उजेडासाठी महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागेल.

गेल्यावर्षी आॅगस्ट २०२१मध्ये जिल्हा नियाेजन समितीने महामार्गावर पथदिवे लावण्यासाठी तीन काेटी रुपयांचा निधी दिला हाेता. तब्बल वर्षभरानंतर निविदा प्रक्रिया राबवून हे काम सुरू करण्यात आले हाेते. मे महिन्यात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला हाेता. सात महिने उलटूनही अद्याप पथदिवे लावण्याचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आधीच्या शासनाने मंजूर केलेल्या नियाेजन समितीच्या कामांना स्थगिती दिली हाेती. त्यामुळे महामार्गावर पथदिवे बसवण्याचे काम सुरू असूनही संबंधित एजन्सीची बिले निघाली नाहीत.

दरम्यान, पावसाळ्यानंतर कंत्राटदाराने महामार्गावरील दुभाजकावर केबल टाकणे, पाेल उभे करणे, हायमास्क उभारणे ही कामे केली आहेत. विद्युत काॅलनी ते खाेटेनगरपर्यंत पाेल उभारणीचे काम अद्याप अपूर्ण आहे. दुभाजक आणि विविध चाैकांत ४०५ पथदिवे लावले जाणार आहेत. यासाठी जुलै महिन्यातच तीन चाैकांत माेठे हायमास्ट, १४ चाैकांत लहान हायमास्ट आणि ३८८ ठिकाणी नियमित पथदिवे लावण्यासाठी फाउंडेशन उभारण्यात आले आहे.

दिवाळीनंतर थांबले काम
कंत्राटदाराने दसरा ते दिवाळी या वेळेत महामार्गावर पाेल उभारले आहे. दरम्यान निधीवरील स्थगिती उठवूनही अद्याप कंत्राटदाराला बिले मिळाले नाही. त्यामुळे पथदिव्यांचे काम लांबणीवर पडले असून महामार्गावरील अंधार लांबला आहे.

कनेक्शनचे काम थांबले
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे लावण्यासाठी १७ ठिकाणी वीज कनेक्शन घेतले जाईल. हे कनेक्शन रस्त्याखालून दुभाजकापर्यंत न्यावे लागणार आहे. निधी उपलब्ध न झाल्याने तांत्रिक अडचणीपाेटी कनेक्शनचे कामही थांबले आहे.

बातम्या आणखी आहेत...