आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन:पालखी अभिवाचनातून रसिकांना वारीचे दर्शन

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंदयात्री परिवर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. बा. मोकाशी लिखित पालखी कादंबरीचे अभिवाचन परिवर्तन संस्थेने केले. पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय या विषयी मराठी माणसांच्या मनातील भावना या कादंबरीच्या अभिवाचनातून कलावंतांनी सादर केल्या. वारीतील अनुभव, गमती-जमती, हौसे-नवसे यांचा जिवंत अनुभव रसिकांना अनुभवता आला.

कार्यक्रमाचे उद‌्घाटन पालखी पूजन करून करण्यात आले. मंचावर तहसीलदार अरुण शेवाळे, जे. के. चव्हाण, डॉ. प्रशांत भोंडे, दीपक पाटील, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते. ‘पालखी’चे नाट्यरूपांतर शंभू पाटील यांनी केले. दिग्दर्शन मंजूषा भिडे यांनी केले. वारीचा आपल्या अभिवाचनातून जिवंत अनुभव देण्यात परिवर्तनचे कलावंत हर्षल पाटील, मंजुषा भिडे, होरीलसिंग राजपूत, अभिजित पाटील, नेहा पवार यशस्वी ठरले. यशस्वितेसाठी आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ. अमोल सेठ, सचिव सुहास चौधरी, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील, खजिनदार डॉ. आशिष महाजन, सहसचिव गणेश राऊत, विश्वस्त प्रा. सुधीर साठे, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पराग पाटील, अमरीश चौधरी, प्रा. नितीन पाटील, कडू माळी, संकेत पमणानी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

भावगीतांना मिळाली दाद
अभंग व भावगीत यांचे सुरेल सादरीकरण सुयोग गुरव, ऐश्वर्या परदेशी, वरुण नेवे यांनी केले. वाद्यवृंद मनीष गुरव व बुद्धभूषण मोरे यांनी कार्यक्रमात रंग भरले. सूत्रसंचालन प्रा. कांचन महाजन यांनी केले. आभार डॉ. राजेश सोनवणे यांनी मानले. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, जय जय रामकृष्ण हरी, अबीर गुलाल, पाऊले चालती पंढरीची वाट, धरीला पंढरीचा चोर, जाता पंढरीशी सुख वाटे जिवा.. या अभंग व भावगीतांनी रसिकांना खिळवले.