आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्ससाठी ऑनलाईन नोंदणी:द्वितीय सत्रातील परीक्षा अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदत; 21 ते 30 जुलै दरम्यान परीक्षा

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएतर्फे जेईई मेन्स परीक्षेच्या द्वितीय सत्रासंदर्भात सूचनापत्रक जारी केले आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. अर्ज सादर करण्यसाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 21 ते 30 जुलै दरम्यान जेईई मेन्सची द्वितीय सत्रातील परीक्षा पार पडणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा घेतली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशासाठी परीक्षेचे दोन सत्र आयोजित केलेले आहे. या दोन्ही मित्रांना प्रविष्ठ होण्याची संधी पात्र विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. त्यानुसार जुलै महिन्यात होणाऱ्या द्वितीय सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना ३० जून पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना निर्धारित शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. यापूर्वी पहिल्या सत्रातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक व पासवर्डचा वापर करून लॉगइन करता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना पेपर, परीक्षेचे माध्यम, परीक्षा केंद्रासाठीचे शहर आदींबाबत माहीती निवडता येईल.

----

पहिल्या सत्रातील परीक्षांना सुरवात

एनटीएतर्फे पहिल्या सत्रातील परीक्षांना गुरुवारपासून सुरवात झाली असून २९ जूनपर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. देशभरातील ५०१ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

----