आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवानाचा मृत्यू:सैन्यात कार्यरत जवानाचा अंगावर बर्फ पडून मृत्यू, महिनाभरात चाळीसगाव तालुक्याने गमावला दुसरा जवान

चाळीसगाव, जि.जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या सकाळी किंवा दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

तालुक्यातील वाकडी गावातील रहिवासी, अमित साहेबराव पाटील (32) हे बीएसएफमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील साहेबराव पाटील, आई, पत्नी मुलगा, मुलगी, लहान भाऊ असा परिवार आहे. सहा दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर जम्मू काश्मिर येथे सीमेवर तैनात असताना बर्फ पडला होता.

यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आज रात्रीपर्यंत जम्मूहून पुण्यात आणण्यात येईल. यानंतर मूळ गावी वाकडी उद्या सकाळी किंवा दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser