आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची लाट:ढगाळ वातावरणाने हाेईल डिसेंबरची सुरुवात

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेरड्या हवामानात सध्या १० अंश सेल्सिअसखाली गेलेला तापमानाचा पारा येत्या आठवड्यात वाढून पुुन्हा १५ अंश सेल्सिअसपुढे जाणार आहे. डिसेंबर महिन्याची सुरुवातच ढगाळ वातावरणाने हाेणार असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता घटेल. त्यानंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते.३० नाेव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राज्यात वातावरण बहुतांशपणे ढगाळ असेल.

गुरुवारी किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअसवर हाेते. ते पुढील आठवड्यात वाढून १५ अंश सेल्सिअसपुढे जाणार आहे. १८ नाेव्हेंबरपासून राज्यात किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. राज्यात नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेलेले आहे. जळगाव जिल्ह्यात सलग ८ दिवस तापमान १० अंशांखाली हाेते. पुढील आठवड्यात किमान तापमानात वाढ हाेऊ शकते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र थंडी असेल.

बातम्या आणखी आहेत...