आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:उड्डाणपुलावरील वाहतुकीचा निर्णय शुक्रवारी ; समज दिल्यानंतर अॅड.पाेकळेंचे  आंदाेलन स्थगीत

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर येथील उड्डाणपुलावर डांबरीकरणाच्या एक लेअरचे काम साेमवारी सायंकाळी पूर्ण झाले. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मक्तेदाराने दुसऱ्या स्तराच्या कामासाठी दाेन दिवसांची मुदत मागीतली आहे. त्यामुळे अवजड वाहतूक वगळता अन्य वाहनांच्या वाहतुकीसंदर्भात शुक्रवारी निर्णय हाेण्याची शक्यता आहे.

पाेलिसांनी नगरसेवक अॅड. दिलीप पाेकळेंना समज दिल्यानंतर नियाेजीत आंदाेलन स्थगित करण्यात आले. साेमवारी वाहतुक सुरू न केल्यास नगरसेवक अॅड. पाेकळे यांनी नागरीकांना साेबत घेवून पुलावरून प्रवास करण्याचा इशारा दिला हाेता. त्यामुळे शहर पाेलिसांनी थेट अॅड. पाेकळेंना सकाळी घरीच गाठले. समजपत्र देवून वाहतूक सुरू न करण्याची सुचना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाईत यांनीही पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुक न करण्याचे आवाहन केले हाेते. त्यामुळे आंदाेलकांनी आंदाेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सकाळी १० वाजता नागरीक माेठ्या संख्येने एकत्र आले हाेते. यावेळी अनेकांनी लाेकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुक करणे याेग्य हाेणार नाही या भूमिकेचेही अनेकांनी समर्थन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवून वाहतुक सुरू करण्यासंदर्भात चर्चा करतील.

बातम्या आणखी आहेत...