आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन सभा:महात्मा फुले यांची जयंती‎ शासकीय सुटी जाहीर करा‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जाेतिराव फुले यांच्या‎ जयंतीनिमित्त ११ एप्रिलला शासकीय‎ सुटी जाहीर करावी, अशी मागणी‎ सत्यशोधक समाज संघाचे‎ संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार‎ यांनी घेतलेल्या ऑनलाइन सभेत‎ करण्यात आली. सत्यशोधक‎ समाजसंघाचे प्रचारक डॉ. सुरेश‎ झाल्टे यांनी माहिती दिली. सभेच्या‎ अध्यक्षस्थानी डॉ. रमेश राठोड होते.‎ सभेत सटाण्याचे यशवंत जाधव,‎ गडचिरोली येथून प्रा. दशरथ आधे,‎ परभणीतून डॉ. सुनील जाधव,‎ नंदुरबारहून नथू काशिनाथ माळी,‎ औरंगाबाद येथून प्रा. वसंत‎ ठाळकर, जळगाव खान्देशातून‎ प्रमोद पाटील, अॅड. रवींद्र गजरे व‎ संतोष महाजन, नांदेड येथून श्याम‎ निलंगेकर येथील प्रतिनिधींनी विचार‎ व्यक्त केले. वंदना वनकर यांनी‎ सूत्रसंचालन केले. तर प्रमोद पाटील‎ यांनी आभार मानले.‎