आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पावसामुळे मिठाच्या उत्पादनात घट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंधन दरवाढ, सतत सुरू असलेल्या पावसामुळे मिठाचे उत्पादन घटले आहे. परिणामी भाव प्रतिकिलाे दाेन ते तीन रुपयांनी वाढले अाहेत. गेल्या आठवड्यात २३ रु. किलाे दराने मिळणारे मीठ २५ रुपये किलाे दराने मिळते आहे.

अधिक मागणी असलेल्या आयाेडिनयुक्त एक किलो मीठ घेण्यासाठी ग्राहकांना आता २५ रुपये मोजावे लागत आहेत. तर अन्य कंपन्यांचे दरही किलोला २० रुपयांपेक्षा कमी नाहीत. जाड मिठाचा वापर अत्यल्प प्रमाणात होतो; मात्र या प्रकारातील मीठ १० रुपये किलोने मिळत आहे. देशात सर्वात जास्त मिठाचे उत्पादन गुजरात राज्यात होते. देशातील एकूण मीठ उत्पादनात गुजरात राज्याचा वाटा ८० टक्क्यापर्यंत आहे. ऑगस्टमध्ये मिठाचे उत्पादन सुरू होते. अमेरिका आणि चीन नंतर मिठागारातून मीठ उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सततच्या पावसामुळे मिठाच्या उत्पादनासह वाहतुकीवर परिणाम होतो. उत्पन्न घटले की टंचाई निर्माण होते. यासह वाढत्या इंधनदरवाढीमुळे भावात वाढ होत असल्याचे जळगावातील व्यावसायिक सांगतात.

असे वाढताहेत दर - डिसेंबर २०२१ डिसेंबरपर्यंत एक किलो मिठाच्या पिशवीचा दर २० रुपयांपर्यंत हाेता. -मार्च २०२२ मध्ये मिठाचे दर किलाेमागे दाेन रुपयांनी वाढून ताे २२ रुपये झालेला आहे. -एप्रिल २०२२मध्ये भाव २४ रुपये किलाे झाले. तर आॅगस्टमध्ये रुपया वाढला.

भाव आणखी वाढणार ^पावसामुळे मीठ खराब होते. त्यामुळे उत्पादन कमी होत असल्याने भावही वाढतात. यात जीएसटीचीही भर पडते. गेल्या सहा महिन्यांत किलोमागे चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. यातही अजून वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. वाढलेले भाव कमी होत नाहीत. - दाऊदी राणाणी, व्यावसायिक

नैसर्गिक गरज भागवा ^मिठाचा वापर वयानुसार कमी जास्त असतो; मात्र आहारात भाज्यांचे प्रमाण व सॅलड जास्त असेल तर नॅचरल सोडियम मिळते. अती मीठ पोटात गेल्याने रक्तदाब, स्मरणशक्ती कमी होते. नैसर्गिक आहारातून मिठाची गरज भागवणेच याेग्य. -सोनल महाजन, आहारतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...