आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या दीपकने वडिलांचे प्रेत घरात असताना दिला होता जीवशास्त्राचा पेपर, विद्यालयात आला दुसरा

प्रवीण पाटील | चोपडा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले दीपक बोरसे याचे कौतुक करताना - Divya Marathi
पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले दीपक बोरसे याचे कौतुक करताना
  • दीपकने पेपर दिल्यानंतर वडिलांना दिला होता अग्निडाग

शिक्षणाची जिद्द राहिली तर मुलं कोणतेही शिखर सहज गाठू शकतात आणि परिस्थिती कोणतीही आली तरी त्याला सामोरे जाऊन यश संपादन करण्यासाठी दुःख,हाल अपेष्टा सहन करून यश मिळवणारे विद्यार्थी अनेक असतात असाच किस्सा दि २ मार्च रोजी वडिलांचे प्रेत घरात असताना त्यांच्या पेपर साठी अंत्ययात्रा उशिरा काढली आणि त्याला बारावीच्या पेपर देऊ दिला होता. त्याच दीपक बोरसेने चोपडा पंकज विद्यालयात दुसरा क्रमांक पटलविला असून त्याचे आज सर्वत्र कौतुक होत आहे.

आभाळाएवढे दुःख बाजूला सारून चक्क वडिलांचे निधन झाल्यानंतरही दि २ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बारावी चा जीवशास्त्र या विषयाचा पेपर दीपक बोरसे नावाच्या मुलाने दिला असून त्या दिवशी दिलेल्या या जीवशास्त्र विषयात त्याला १०० पैकी ८९ मार्क मिळाले आहेत. डोळ्यात अश्रू असले तरी त्याच्या कडे असलेल्या जिद्दीने त्याने बारावीचा पेपर दिला होता.पेपर च्या दिवशी विद्यालयातील मुख्याध्यापक व्ही आर पाटील सह अन्य शिक्षकांनी त्याला धीर दिला होता.

पेपर देऊन दिला होता वडिलांना अग्निडाग :- 

१ मार्च च्या मध्यरात्री वडिलांचे मध्यप्रदेश येथे हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले आणि मुलगा दिपकने सकाळी अकरा ते दोन वाजेच्या दरम्यान बाराविचा पेपर सोडविला.आणि एकलुता एक मुलगा असल्याने मुलगा आल्याशिवाय अग्निडाग देता येणार नाही म्हणून दुपारी साडे चार वाजता दिपकने बारावीचा पेपर संपून दुपारी साडे चार वाजता शेवटचे दर्शन घेऊन वडिलांना अग्निडाग दिला होता.यावेळी मात्र त्याचा अश्रूंचा बांध फुटला होता.

पंकज उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वी सायन्स शाखेतील विद्यार्थी दिपक सुरेश बोरसे याने जिद्दीने आज पंकज विद्यालयात दुसरा क्रमाकाने यश संपादान केले आहे.

दिपक सुरेश बोरसे हा अत्यंत हुशार व मेहनती विद्यार्थी आहे. त्याला इयत्ता १० वी ला देखील ९१टक्के गुण मिळालेले आहेत, JEE MAIN - JAN 2020 च्या परीक्षेत त्याला ९२ टक्के प्राप्त झालेले आहेत. NEET 2020 च्या परीक्षेत यश मिळवून त्याचा MBBS ला जाण्याचा मानस आहे.दिपकने महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालयात सेंटर क्र.८४० वर सकाळी अकरा ते दोन वाजे दरम्यान जीवशास्त्र विषयाचा पेपर दिला होता.

बातम्या आणखी आहेत...