आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी:जामनेरातील टाकळी खुर्दला दगडफेकीदरम्यान ग्रामस्थाचा बेशुद्ध झाल्यानंतर मृत्यू

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर वाद उफाळून आला. दोन गटात झालेल्या दगडफेकीदरम्यान बेशुद्ध पडल्यानंतर भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर मृत्यूच्या कारणावरुन तर्कवितर्क आणि अफवांवर प्रशासनाने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

धनराज श्रीराम माळी, (वय 32) असे मृत ग्रामस्थाचे नाव आहे.टाकळी खुर्द गावात दोन्ही पॅनल भाजपच्या कार्यकर्त्यांचे होते. मतमोजणीनंतर एका पॅनलचा विजय दुसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना पराभव जिव्हारी लागला.

गावात गेल्यानंतर विजयी उमेदवार दर्शनासाठी मंदिरावर जात असताना वाद उफाळून आला. काही घरांवरुनही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीदरम्यान बेशुद्ध पडल्याने धनराज माळी या ग्रामस्थाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरु केली आहे.

कुऱ्हा काकोडा खडसे समर्थक पॅनल

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीत आमदार एकनाथ खडसे समर्थकांचे राष्ट्रवादीचे पॅनल निवडून आले आहे. खडसे समर्थकांचे 17 पैकी 13 तर शिंदे गटाचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. डॉ.बी.सी.महाजन यांनी शिंदे गटाचे सरपंचपदाचे उमेदवार भागवत राठोड यांचा पराभव केला आहे.

उत्सुकता,जल्लोष अन् खुन्नस

मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. मतमोजणी होत असताना निकालाची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. विजयी उमेदवार जाहीर होताच एकच जल्लोष केला जात होता.त्याचबरोबर समर्थक पराभूत उमेदवारांना खुन्नस देताना दिसले.

बातम्या आणखी आहेत...