आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमाेजणी:वैयक्तिक प्रचारामुळे राष्ट्रवादीचा पराभव ; शह-काटशहाचे राजकारण चव्हाट्यावर

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅनल म्हणून एकत्रितपणे प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी पॅनल नव्हे तर वैयक्तिक प्रचार केल्याची बाब मतमाेजणीच्या आकडेवारीवरून समाेर आली आहे. या मुद्द्यावरून पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि शह-काटशहाचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे. सध्या पराभूत उमेदवार या आकडेवारीचे विश्लेषण करीत आहेत.

राष्ट्रवादीच्या पॅनलमधून विजयी झालेल्या छाया देवकर यांना सर्वाधिक २३५ मते आहेत. पराग माेरे यांना २३० मते, अनिल पाटील यांना २४६ मते, प्रमाेद पाटील यांना २४७ मते आहेत. रवींद्र पाटील यांना २१६ मते तर देवकरांसाेबत उमेदवार असलेल्या मनीषा सूर्यवंशी यांना अवघी १६४ मते मिळाली आहेत. मंदाकिनी खडसेंना १७९ मते, वाल्मीक पाटील यांना १६७ मते मिळाली आहेत. विजयी झालेल्या अनिल पाटील, छाया देवकर आणि प्रमाेद पाटील यांची मतदान केंद्रनिहाय मते थाेड्याबहुत फरकाने सारखी आहेत. त्यामुळे उमेदवारांचा वैयक्तिक प्रचार झाल्याचा आराेप पराभूत उमेदवारांकडून हाेत आहे. डाॅ. सतीश पाटील यांना पाचाेरा, अमळनेर आणि चाळीसगावमधून लीड असताना त्यांना एकट्या फैजपूर केंद्रात २१ मते कमी मिळाली आहेत तर त्यांचा १९ मतांनी पराभव झाला आहे.

आमदारांना अन्य मतदारसंघांत लीड : आ. मंगेश चव्हाण यांना चाळीसगाव, अमळनेर, फैजपूर व पाचाेऱ्यात लीड आहे. आमदार अनिल पाटील यांना चाळीसगावात आ. संजय सावकारे यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत भुसावळमध्ये कमी मते आहेत. त्याउलट त्यांना फैजपूर आणि अमळनेर तालुक्यात सर्वाधिक मते आहेत. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अमळनेर, फैजपूर, पाचाेरा, एरंडाेलला मताधिक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...