आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याचे काम:जळगाव ते औरंगाबाद महामार्ग कामात दिरंगाई ; महापाैरांची थेट केंद्रीय मंत्री गडकरींकडे तक्रार

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या अजिंठा चाैफुली ते एमआयडीसीपर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. कामात प्रचंड दिरंगाई हाेत असल्याने वाहनधारकांचे हाल हाेत आहेत. या संदर्भात महापाैर जयश्री महाजन यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून तक्रार केली आहे.

अजिंठा चाैफुली ते कुसुंबापर्यंत दाेन्ही बाजूने एमआयडीसी असल्याने कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. असे असतानाही सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून अजिंठा चाैफुलीपासून औरंगाबाद रस्त्यावर तीन किमी अंतराच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. महामार्गाच्या कामात प्रचंड दिरंगाई हाेत आहे. परिणामी वाहतुकीचा खाेळंबा तर हाेत आहेच; साेबत लहान माेठ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याची दखल घेत महापाैर जयश्री महाजन यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. यात महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांत नाराजी असून असंताेष वाढताे आहे.

बातम्या आणखी आहेत...