आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आवळा, शमीपत्र, लकी बांबूच्या राेपांची मागणी दुप्पट; पुरवठा झाला कमी, भाव चारपट वाढले

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक विधी, पूजा, व्रतासाठी घरात शमीपत्रे, आवळ्याचे खूप महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर शहरात महिलांकडून या झाडांच्या राेपांची मागणी वाढली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने अलीकडे शमीच्या राेपांची किंमत ५०वरून २०० रुपयांवर गेली आहे. महिलांकडून लकी बांबू, पीस लिली या शाेभिवंत इनडाेअर झाडांचीही विचारणा हाेत आहे.

गेल्या वर्षभरात घरातील परसबागेत, गॅलरीतील कुंडीत शमीपत्र, आवळा ही राेपे लावण्याकडे महिलांचा कल आहे. आध्यात्मिक महत्त्व असलेली ही राेपे धार्मिक विधीत सुचवली जात असल्याने शहरातील नर्सरी चालकांकडे या राेपांची मागणी वाढली आहे. पूर्वी महिन्यातून एक किंवा दाेन ग्राहक यासंदर्भात विचारणा करायचे. पण आता शमीपत्रे या झाडाची राेज किमान १५ ते २० राेपांची विक्री हाेत आहे. शहरात विविध नर्सरीमध्ये येणारी शाेभिवंत, फुलांची झाडे ही आंध्र प्रदेशातील नर्सरीतून येतात. यावर्षी पावसाळा संपल्यानंतर त्यांची मागणी वाढली आहे.

आवळ्याची मागणी
ग्राहकांकडून शमीपत्रे, आवळा या राेपांची मागणी हाेते. नर्सरीमध्ये फिरल्यानंतर साेबत लकी बांबू, पीस लिली, गुलाब व इनडाेअर शाेभिवंत झाडांची खरेदी हाेत आहे. मागणी दुप्पट वाढली आहे.- दीपक भाेई, नर्सरीचालक

निसर्गप्रेमींचे आकर्षण वाढले
उन्नती, साैभाग्याचे प्रतीक मानला जाताे. रोपट्याला मातीचा उपयोग न करता केवळ पाण्यावर त्याला जगवता येते. फेंगशुईनुसार घरातील पूर्व आणि दक्षिण-पूर्व कोपऱ्यात या बांबूच्या रोपाला ठेवल्याने विशेष फायदा मिळतो. बांबूच्या रोपाला ऑफिसच्या टेबलावर उजवीकडे ठेवणे शुभ मानले जाते. म्हणून त्याचे आकर्षण वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...