आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तुरडाळीच्या मागणीत पंधरा दिवसांत 25 टक्के घट, भाव प्रतिकिलो 10 रुपयांनी घसरल्यामुळे गृहिणींना दिलासा; आंब्याचे सिझन असल्याने जळगावात हरभऱ्याच्या डाळीच्या मागणीत झाली वाढ

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुरडाळ पंधरा दिवसांपूर्वी १०० रुपये किलो होती. मात्र, मागणीत सुमारे २५ टक्के घट झाल्याने भाव प्रतिकिलाे १० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे गृहिणींना तात्पुरता का असेना पण दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्याचा विचार केला तर एका दिवसाला ३५ ते ४० टन तूरडाळची विक्री एप्रिल-मे महिन्यात होते. या काळात डाळ खरेदी केली जाते. मात्र, यंदा मागणी कमी असल्याने व्यापाऱ्यांनी डाळीची मागणी कमी नोंदवली आहे. नियमित मागणी घसरून राेज २५ टनापर्यंत आली आल्याचे दाणा बाजार असोसिएशन अध्यक्ष प्रवीण पगारिया यांचे म्हणणे आहे.

हिवाळा संपेपर्यंत डाळवर्गीय कडधान्याचे उत्पादन बाजारपेठेत येते. त्यावर प्रक्रिया करून डाळी तयार होतात. त्या विक्रीसाठी मार्च महिन्यापासून बाजारपेठेत येतात. प्रत्यक्षात नवीन गहू बाजारपेठेत आल्यानंतर वर्षभरासाठी गहू, तांदूळ व डाळींची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो.

बातम्या आणखी आहेत...