आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती, वेतन निश्चिती वेळेत करा:मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे मागणी

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागासवर्गीय प्राध्यापकांची पदोन्नती आणि वेतननिश्चिती वेळेत करा, आयक्यूएसीतर्फे मागासवर्गीय प्राध्यापकांची नेमणूक करा, समाजकार्यच्या प्राध्यापकांचे प्रश्न निकाली काढण्याचे आदेश करावे, विद्यार्थ्यांचे वाढलेले शुल्क कमी करावे या मागण्यांबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेतर्फे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांबाबत कुलगुरुंशी चर्चा करण्यात आली. या वेळी आठ मागण्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. यावर चर्चा करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन कुलगुरू माहेश्वरी यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, बीसीयूडी विभागाचे अधिकारी तळेले उपस्थित होते. नवीन नेमणूक झालेले कुलसचिव प्रा. विनोद पाटिल यांचा या प्रसंगी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान मागासवर्गीय प्राध्यापकांच्या समस्यांबाबत समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनाही संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.