आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या लोकायुक्त विधेयकास मंजुरी द्या:माहितीचा अधिकार कार्यकर्ता संघाची मागणी

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या लोकायुक्त विधेयकास महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी देऊन विधेयकाचे कायद्यात रूपांतर करा अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनतर्फे बुधवारी उप जिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडे देण्यात आले.अस्तित्वात असलेल्या आणि कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील लोकायुक्तांना कायद्याने अनेक मर्यादा घातलेल्या आहेत. त्यामुळेच लोकयुक्तांकडे तक्रार करूनही तक्रारदारांना न्याय मिळत नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागणीनंतर केंद्रातील लोकपालच्या धर्तीवर राज्यात प्रभावी, सशक्त व अधिकार असलेले लोकायुक्त नियुक्त करण्यासाठीच्या मसुद्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त विधेयकास मंजुरी देऊन कायद्यात रुपांत करावे अशी विनंती निवेदनातून केली आहे. याप्रसंगी फेडरेशचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, शैलेश सपकाळे, गुणवंतराव सोनवणे, नरेंद्र सपकाळे, चंद्रकांत श्रावणे, आनंद बेहेडे, प्रवीण भोई, राजू खडके, भीमराव सोनवणे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...