आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:गुलाबरावांविराेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना ‘नटी’ म्हटल्याचा आराेप करत ठाकरे गटाने रविवारी जाेरदार आंदाेलन केले. गुलाबरावांविराेधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा यासाठी दुपारी माेर्चा काढत शहर पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन केले. शिवसैनिकांची तक्रार स्वीकारून कायदेशीर मार्गदर्शन घेणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाने आता पालकमंत्र्यांविराेधात न्यायालयीन लढाई लढण्याची घाेषणा केली.

महाप्रबाेधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ३ दिवस जळगाव दाैऱ्यावर येऊन गेल्या. अंधारे यांनी केलेल्या आराेपांसंदर्भात माध्यमांशी बाेलताना पालकमंत्री पाटील यांनी ‘नटी’ तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाला ‘सिनेमा’ म्हटल्याने महिलांचा अवमान झाल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्र्यांविराेधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. रविवारी दुपारी १२ वाजता सुमारे १०० ते १५० शिवसैनिकांनी शहर पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढत तासभर ठिय्या आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...