आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक मित्र मंडळ:विज्ञाननगरीत आयटीआयचे प्रात्यक्षिक

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे यंदा ‘इस्रो’वर अर्थात (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) आधारित ‘विज्ञाननगरी’ ही थीम घेऊन आरास साकारण्यात येत आहे. त्यात इस्राेचा गौरवशाली इतिहास, चांद्रयान, मंगलयान सारख्या यशस्वी मोहिमांची माहिती देण्यात येईल.

पीएसएलव्ही व जीएसएलव्ही रॉकेट लॉन्चर्स प्रतिकृती, सूर्यमाला व इतर ग्रहांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे. देखावा तयार करण्याचे काम आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दिले आहे. मशिनिस्ट, मोटार मॅकेनिक या दोन ट्रेडचे विद्यार्थी प्रात्यक्षिक म्हणून हा प्रकल्प साकारत आहेत. त्यांना प्राचार्य ए. आर. चौधरी, बाळासाहेब कुमावत, एम. एम. पाटील, संजय कोळी मार्गदर्शन करीत आहेेत.

बातम्या आणखी आहेत...